Eknath Shinde : ही भेट राजकीय नव्हती, मनोहर जोशींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
सरकारच्या माध्यमातून चांगले काम करावे लागेल, लोकांच्या हिताच्या योजना पूर्ण कराव्या लागतील, राज्याला न्याय देण्यासाठी काम करणार, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर जोशींची (Manohar Joshi) भेट घेतली. मनोहर जोशींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात चांगले काम झाले. बाळासाहेबांसोबत त्यांनी काम केले. बाळासाहेबांच्या काळात ते प्रमुख होते. अशा लोकांचे आशीर्वाद घेणे आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. युती सरकारमध्ये 60 योजना जाहीर झाल्या, त्या पूर्ण करायच्या आहेत. बाळासाहेबांची योजना सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. सरकारच्या माध्यमातून चांगले काम करावे लागेल, लोकांच्या हिताच्या योजना पूर्ण कराव्या लागतील, राज्याला न्याय देण्यासाठी काम करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर ही राजकीय भेट नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत (Sanjay Raut) रोजच पत्र देतात, त्यावर काय बोलायचे, असे ते म्हणाले.
Published on: Jul 28, 2022 08:08 PM