‘तो’ निर्णय तुम्ही नाही, तर आम्हीच घेतलाय; विधानसभेत मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली

| Updated on: Mar 09, 2023 | 12:00 PM

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांना मदत करतो म्हणून तुम्ही मदत केली नाही. 50 हजार रूपये शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन तुम्ही दिलं. पण ते पूर्ण केलं का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना विचारला आहे. पाहा...

मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलाय. 12 हजार कोटींची मदत केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत आम्ही देणारच आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनान म्हटलं. याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी त्यांना प्रश्न विचारले. तेव्हा भुजबळसाहेब, तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. पण आम्ही करतो आहोत. तुमच्यासारखं शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाणी पुसली नाहीत, असं शिंदे म्हणाले. नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाली आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Published on: Mar 09, 2023 11:52 AM
36 Jilhe 50 Batmya : नाशकात होणार नुकसानीचे पंचनामे; भरघोस मदतीची अपेक्षा
संजय राऊत यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याची गरज; कुणी डागलं टीकास्त्र?