आमचं सरकार शेतकरी, कामगार आणि कष्टकरी, सर्व घटकांना न्याय देणारं; एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

| Updated on: Mar 26, 2023 | 2:59 PM

CM Eknath Shinde : विरोधकांना बोलायचं ते बोलू देत, आम्ही आमचं काम करत राहणार आहोत. जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घेत राहणार, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. पाहा...

ठाणे : आज ठाण्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या कामाबद्दल माहिती दिली. तसंच विरोधकांवरही टीका केलीय. शेतकरी, कामगार आणि कष्टकरी तसेच सर्व घटक हे यांना न्याय देणारं आमचं सरकार आहे. कोणताही घटक हा वंचित राहिला नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलंय. तेव्हापासून गोरगगरीब आणि सर्वसामान्यांच्या हिताचा विचार आम्ही करत आहोत. त्यांच्यासाठी काम करत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 26, 2023 02:59 PM
निर्णय गतिमान जाहिरातबाजी आणि आनंदाचा शिधावरून अजित पवारांची टोलेबाजी
उध्दव ठाकरे यांच्या सभास्थळी पोहोचण्याच्या मार्गात बदलाची शक्यता; कारण काय?