मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर; काय कारण?

| Updated on: Feb 11, 2023 | 9:20 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. कणेरी मठ इथं होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. पाहा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. कणेरी मठ इथं होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पंचमहाभूत लोकोत्सव होणार आहे. पंचमहाभूत लोकोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येण्याची शक्यता आहे. लोकोत्सव कार्यक्रमासाठी आठ राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणेरी मठ येथील कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

अब दिल्ली दूर नही ! दिल्ली ते मुंबईचा प्रवास अवघ्या १२ तासात, कधी होणार लोकार्पण?
एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ही’ अपेक्षा, शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं