काटा किर्रर्र, विषयच हार्ड…मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला कोल्हापुरकरांची गर्दी
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात कोल्हापूरातील तपोवन मैदानावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कोल्हापूर : शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात कोल्हापूरातील तपोवन मैदानावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या गर्दीला अनुसरुन एकनाथ शिंदे यांनी, “तुमचा उत्साह बघून नाद खुळा आणि विरोधकांचा टांगा पलटी झाला असेल. उच्चांकी गर्दी करून कोल्हापूरकरानी विषय हार्ड केला”, असल्याचेही म्हटले आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून जनसामान्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे हे सर्वसामान्यांच्या जिव्हाळचे सरकार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. “अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या बैठकीत पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सरकारचे सर्वसाधारण धोरण आहे”, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.