‘या’ कारणामुळे मी मुख्यमंत्री झालो; एकनाथ शिंदे यांनी आपला प्लस पॉइंट सांगितला…

| Updated on: Feb 13, 2023 | 7:34 AM

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागचं कारण काय? कोणत्या कारणामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले? या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ते काय म्हणालेत. पाहा...

ठाणे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? कोणत्या कारणामुळे शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी एकाच वाक्यात दिलं. “एकदा शब्द दिला की मी मागे फिरत नाही. तो शब्द पाळलाच जावा हा माझा अट्टहास असतो. म्हणून मी मुख्यमंत्री झालो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच जनता आपल्याला निवडून देते. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत. लोकोपयोगी कामं व्हावीत, हाच माझा ध्यास आहे, असंही शिंदे म्हणाले. ते ठाण्यात बोलत होते.

Published on: Feb 13, 2023 07:33 AM
राज्यपालांची प्रतिमा महाराष्ट्रात वादाची ठरली, काय म्हणाले एकनाथ खडसे?
भाजपसोबत युती तोडली, नातं टिकवावे, उद्धव ठाकरे यांना कुणी दिला हा सल्ला ?