“राज्य सुजलाम सुफलाम होऊन, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विठ्ठलाचरणी प्रार्थना
आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला. महापूजेनंतर श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला. महापूजेनंतर श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, “आज मला आणि माझ्या कुटुंबाला शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मिळालं, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊन पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत अशी त्यांनी प्रार्थना केली. तसेच विरोधकांकडे टीका आणि टोमणे याशिवाय काय नाही आहे. त्यांच्या आरोपांना मी कामातून उत्तर देईन.”