Eknath Shinde : ‘सुरुवात कुणी विसरता कामा नये, माझी सुरुवात….’ किसन नगर 3 मध्ये बाप्पाची पूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,..

| Updated on: Aug 31, 2022 | 5:36 PM

किसन नगर भागातील लोकांनी मला मोठं केलं. आज राज्याचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून मला संधी दिली आहे. या ठिकाणी दर्शन घेतल्यानं समाधान मिळालंय, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली.

ठाणे : सुरुवात कुणी विसरता कामा नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलंय. ते ठाण्यात बोलत होते. ठाण्यातील (Thane) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी संवाद साधला. माझा सुरुवात किसन नगर भागातून झाली, असं ते म्हणाले. हे मी कधीही विसरु शकत नाही. किसन नगर भागातील लोकांनी मला मोठं केलं. आज राज्याचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून मला संधी दिली आहे. या ठिकाणी दर्शन घेतल्यानं समाधान मिळालंय, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली. लहानपणापासूनच मी किसन नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. मात्र त्या काळात लोकंच पुजेच्या साहित्यापासून सगळ्या गोष्टी देत होते, असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसन नगर भागातील जनजागृती गणेश मंडळ आणि शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळ किसन नगर तीनमध्ये बाप्पाची मनोभावे पुजा केली.

Andheri Raja | अंधेरीच्या राजाला सोन्याचा मुकूट, विधिवत केली पूजा
Video : ‘उद्धव ठाकरेच कंत्राटी मुख्यमंत्री’ नारायण राणेंचा शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा, आदित्य ठाकरेंनाही डिवचलं