CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, वाचा एका क्लिकवर
शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नव्या पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रंही देण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली. अधिक जाणून घ्या...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नव्या पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रंही देण्यात आली आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सत्ता गेली पण आता पक्षही हातचा जातो का? खरी शिवसेना कुणाची? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशास्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिलाय. शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नव्या पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रंही देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंकडून कुणाला कोणतं पद?
> किरण पावसकर – शिवसेना सचिव
>> संजय मोरे – शिवसेना सचिव
>> दीपक केसरकर – मुख्य प्रवक्ते
>> उदय सामंत – प्रवक्ते
>> किरण पावसकर – प्रवक्ते
>> गुलाबराव पाटील – प्रवक्ते
>> शीतल म्हात्रे – प्रवक्ते
>> डॉ. बालाजी किणीकर – खजिनदार