निवडणूक आयोगासमोर सहा पर्याय मांडले, पण ‘या’ एकमेव चिन्हासाठी शिंदेगट आग्रही

| Updated on: Oct 11, 2022 | 11:48 AM

आजचा दिवस शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच शिंदेगटाला आपलं निवडणूक चिन्ह मिळू शकतं. पाहा...

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली : आजचा दिवस शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच शिंदेगटाला (Eknath Shinde) आपलं निवडणूक चिन्ह मिळू शकतं. निवडणूक चिन्हासाठी शिंदेगटाने निवडणूक आयोगाला (Election Commission) दोन मेल पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा हे तीन तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. यातील ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह मिळावं म्हणून शिंदेगट आग्रही असल्याची माहिती आहे.

Published on: Oct 11, 2022 11:24 AM
‘उद्धव गटाला मिळालेलं नाव ‘उद्धव काँग्रेस सेना’…. ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
“सध्याच्या सगळ्या घटनांमागे भाजपचा हात आणि षडयंत्र”, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका