शिवसेनेच्या बंडाळीला 1 वर्ष पूर्ण; एकनाथ शिंदे यांच्या वडिलांकडून केक कापत ‘स्वाभिमान दिन’ साजरा!
20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केला होता आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. याचाच निषेध म्हणून मंगळारी राज्यभर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिवस साजरा केला जातोय.त्याचा विरोध करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी स्वाभिमानी दिवस साजरा केला आहे.
ठाणे : 20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केला होता आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. याचाच निषेध म्हणून मंगळारी राज्यभर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिवस साजरा केला जातोय.त्याचा विरोध करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसैनिकांनी स्वाभिमानी दिवस साजरा केला आहे. ठाण्यात शिवसैनिकांनी हा दिवस साजरा करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. किसन नगर येथील शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि लाडू वाटून स्वाभिमान दिवस साजरा केला. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे यांचे धाकटे बंधू नगरसेवक प्रकाश शिंदे आणि मुख्यमंत्र्याचे वडील संभाजी शिंदे यांनी केक कापत स्वाभिमान दिवस साजरा केला.
Published on: Jun 21, 2023 11:30 AM