Special Report | राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचं रोखठोक उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी याबाबत उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पाठवलेल्या पत्राला पत्राने उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यानुसार कार्यवाही करुन आपल्याला कळवावे, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी याबाबत उत्तर दिलं आहे.
Published on: Jul 02, 2021 10:27 PM