Eknath Shinde : सुप्रिया सुळेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांकडून प्रत्युत्तर..! म्हणाले…
कॅमेरे घेऊन जाण्याची सवय मला व माझ्या सहकार्यांना नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहे. बाकी लोक कुठे जातात हे तुम्हीच समजू घ्या म्हणत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. मुख्यमंत्री पदावर असलो तरी सर्वसामान्यांची नाळ कधी तुटू देणार नाही. भले ज्यांना टीका करायची ते करु दे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकाकरांना उत्तर दिले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दौरे पाहता (Maharashtra) राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असल्याचा टोला (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. मुख्यमंत्री हे फोटोसेशनमध्ये बिजी असतात तर उपमुख्यमंत्री हे प्रशासन सांभाळतात असा त्यांचा रोष होता. त्याला (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत उत्तर दिले आहे. कॅमेरे जिथे घेऊन जाता येतात तिथेच आमचे दौरे असतात असे म्हणत आमचे जे काही आहे ते सर्व इन कॅमेरा असाच रोष मुख्यमंत्र्यांचा होता. शिवाय कॅमेरे घेऊन जाण्याची सवय मला व माझ्या सहकार्यांना नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहे. बाकी लोक कुठे जातात हे तुम्हीच समजू घ्या म्हणत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. मुख्यमंत्री पदावर असलो तरी सर्वसामान्यांची नाळ कधी तुटू देणार नाही. भले ज्यांना टीका करायची ते करु दे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकाकरांना उत्तर दिले आहे.