Auto Strike : सीएनजी महागला; भाडेवाढीसाठी रिक्षाचालकांचा संपाचा इशारा

| Updated on: Jul 22, 2022 | 9:49 AM

गेल्या वर्षभरात सीएनजीच्या (CNG) दरात तब्बल 28 रुपयांची वाढ झाली, मात्र या काळात रिक्षाभाडे अवघ्या दोन रुपयांनीच वाढले. त्यामुळे भाडेवाढ न केल्यास येत्या 31 जुलैपासून संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा रिक्षाचालकांच्या वतीने देण्यात आला आहे.

ठाणे : गेल्या वर्षभरात सीएनजीच्या (CNG) दरात तब्बल 28 रुपयांची वाढ झाली, मात्र या काळात रिक्षाभाडे अवघ्या दोन रुपयांनीच वाढले. रिक्षाभाड्यामध्ये वाढ करावी याकरता गेल्या तीन महिन्यांपासून रिक्षाचालकांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र दखल घेतली जात नसल्याने कोकण विभागातील पाच जिल्ह्याच्या रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या  31 जुलैपासून लाखो रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार आहेत.

Published on: Jul 22, 2022 09:48 AM
Wardha : शिवसेनेकडून वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
Monsoon Update : वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच; पिकांना फटका