बॉडी बॅग घोटाळ्यानंतर मुंबई मनपातील आणखी एक घोटाळा उघड; किरीट सोमय्यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी कोरोना काळात ठाकरे गटाच्या नेत्यांकडून खिचडी घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी कोरोना काळात ठाकरे गटाच्या नेत्यांकडून खिचडी घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस, ईडी, आयकर आणि मुंबई महापालिकेत तक्रार केल्याची माहिती आहे. त्यामुळे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यानंतर खिचडी घोटाळ्यात सोमय्यांच्या टार्गेटवर कोणता नेता असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Aug 08, 2023 10:06 AM