मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी महाराष्ट्र सदनात घडला ‘हा’ प्रकार, काँग्रेस नेत्याने केला गंभीर आरोप
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. पण ही जयंती साजरी करताना महाराष्ट्र सदनाच्या मध्यभागी असेलले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे मूळ जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आले होते, कार्यक्रम झाल्यावर दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर आणून ठेवण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. पण ही जयंती साजरी करताना महाराष्ट्र सदनाच्या मध्यभागी असेलले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे मूळ जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आले होते, कार्यक्रम झाल्यावर दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर आणून ठेवण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “पुतळे हलवलेणे, महाराष्ट्राच्या सरकारला शोभणारे नाही”, अशी टीका पवार यांनी केली होती. आता या आरोपांनंतर काँग्रेसनेही आरोप केला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला जागा व्हावी म्हणून पुतळे हटवले”, असा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला. दरम्यान या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.