कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांची दुसरी 23 जणांची यादी कॉंग्रेसने जाहीर केलेली आहे. या यादीत श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा पत्ता कट केलेला आहे. कोल्हापूरची शिरोळची जागा कॉंग्रेसला स्वत:कडे राखता आली आहे.
कॉंग्रेसने विधानसभेसाठी आधी आपल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. कॉंग्रेसने आता 23 जणांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. सायन -कोळीवाड्यातून गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. दुसऱ्या यादीत तीन महिलांना तिकीट दिलेले आहे. जळगाव-जामोद येथून स्वाती विटेकर, सावनेरमधून अनुजा केदार आणि भंडारा येथून पूजा ठावकर यांना उमेदवारी दिलेली आहे. काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट केलेला आहे. भुसावळ- राजेश मानवतकर, जळगाव- जामोद- स्वाती विटेकर, वर्धा- शेखर शेंडे, सावनेर- अनुजा केदार, नागपूर दक्षिण- गिरीश पांडव, कामठी- सुरेश भोयर, भंडारा- पूजा ठावकर, अर्जुनी मोरगांव- दिलीप बनसोड, आमगाव- राजकुमार पुरम, राळेगाव- वसंत पुरके, यवतमाळ- अनिल मंगुलकर, अरणी- जितेंद्र मोघे, उमरखेड- साहेबराव कांबळे, जालना- कैलास गोरंट्याल, छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख, वसई- विजय पाटील, कांदिवली पूर्व- काळू पडलिया, चारकोप – यशवंत सी., सायन- गणेश यादव, श्रीरामपूर – हेमंत ओघळे, निलंगा- अभयकुमार साळुंखे, शिरोळ- गणपतराव पाटील, अकोट – महेश गणगणे अशी 23 उमेदवारांची नावे आहेत.