सरकार मोदी-शहा यांचं हस्तक; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पुन्हा शिंदे, फडणवीस यांना टोला

| Updated on: Nov 02, 2022 | 1:54 PM

काँग्रेसकडून पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. तपासयंत्रणांचा गैरवापर करून राज्यात सरकार अस्तित्वात असल्याची टीका करण्यात आली आहे.

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार मोदी, शहा यांचे हस्तक बनल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तपासयंत्रणांचा गैरवापर करून राज्यात सरकार अस्तित्वात असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आम्ही मोदींचे हस्तक आहोत. याचाच अर्थ ते महाराष्ट्राचे हस्तक नाहीत. कोणती श्र्वेतपत्रिका काढायची ती काढा जे खरं आहे ते काय आता जनतेपासून लपलेलं नाही, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Nov 02, 2022 01:47 PM
तुमची भांडणं घरी ठेवा, मंत्र्याने चॅलेंज दिलं तिथं जाणार अन् शेतकऱ्यांचं काय? आदित्य ठाकरेंना कुणाचा सवाल?
‘ही’ खेळी शिंदे सरकारवरच बुमरँग? RTI तून मिळालेल्या माहितीवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया पाहा Video