संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे काय म्हणाले ?
सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली.
सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली. उद्धव ठाकरेंनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याचे सांगत राऊत यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या भूमिकेवर आता महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असून काँग्रेसचे नेते विकास ठाकरेंनीही भाष्य केले आहे.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो, कारण या लहान निवडणुका आहेत. आणि त्यांना जर महाविकास आघाडीतन बाहेर पडून स्वतंत्र लढायचं असेल तर काँग्रेस पक्ष हा मोठा,राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. काँग्रेसने ज्या ज्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या स्वबळावरचं लढल्या आहेत. त्यामुळे आम्हाला कोणाला सोबत घेण्याची गरज नाही असे म्हणत या घोषणेचं आम्ही स्वागत करतो,असे विकास ठाकरे म्हणाले.