‘एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, आता तीन तलवारी?’ काँग्रेस नेत्याचा टोला

| Updated on: Jul 16, 2023 | 8:50 AM

यावेळी त्यांनी राज्यातील सध्या सुरू असलेल्या गोंधळावर भाष्य करताना, यापूर्वी राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती पाहिली नाही. एका वर्षात दोनदा पक्ष फोडणं कधी आजपर्यंत झालेलं नाही.

कराड (सातारा) : अजित पवार यांनी सत्तेत प्रवेश केल्याने भाजपवर सध्या जोरदार टीका केली जत आहे. याचमुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी थोरात यांनी आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाय.. नाय… म्हणणारेच गेले. तर फडणवीस बोलतात त्यांच्या उलटं वागत आले आहेत असा घणाघात फडणवीस यांच्यावर केला आहे. ते विलासराव पाटील उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे आले असता बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सध्या सुरू असलेल्या गोंधळावर भाष्य करताना, यापूर्वी राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती पाहिली नाही. एका वर्षात दोनदा पक्ष फोडणं कधी आजपर्यंत झालेलं नाही. आज आमदारांच्यात संघर्षाचं वातावरण असल्याचंही थोरात यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सध्या जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून जनतेत प्रचंड नाराजी आहे. तर एक मुख्यमंत्री, एक पूर्वीचा मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री याला आता मुख्यमंत्री व्हायचंय अशी अवस्था सध्या सरकारची आहे. तर एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, पण आता तीन तलवारी एका म्यानात आहेत त्यामुळे ते एकमेकांना समजून घेऊन चांगला राजकारभार करतील.

Published on: Jul 16, 2023 08:50 AM
“माझी क्लिप सेव्ह करा, आदित्य ठाकरे यांची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये असेल”, भाजप नेत्याचा मोठा दावा
मनसेचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा? मनसेचा आमदार म्हणतो…