‘हा काय इंग्रजांचा काळ आहे का?’, काँग्रेस नेत्याचा सरकारला सवाल?

| Updated on: Aug 09, 2023 | 10:18 AM

त्यांनी सांताक्रूझ पोलिसांनी मुंबईत ताब्यात घेतलं आहे. त्यावरून आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. यावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई, 9 ऑगस्ट 2023 । भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांनी सांताक्रूझ पोलिसांनी मुंबईत ताब्यात घेतलं आहे. त्यावरून आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. यावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी जगताप यांनी, भारत छोडो मोहीम इथून सुरुवात झाली होती. आज असं वाटतं आहे की पुन्हा 1942 आलं आहे की काय? कारण ज्या इंग्रजांना भारतीयांना आवाज दाबता आला नाही. तो प्रयत्न हे सरकार करत आहे. तर आता गांधीजींचे वंशज तुषार गांधी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे गंभीर आहे. मी सरकारचा निषेध करतो.

Published on: Aug 09, 2023 10:18 AM
आमदार अपात्रतेचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार? बच्चू कडू यांच्या विधानाने चर्चेला उधाण
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे यांची डिनर डिप्लोमसी; आमदारांसह स्नेहभोजन, कारण नेमकं काय?