‘काही प्रश्नांची उत्तर द्यायचे नाहीत असे शासनाने ठरवलंय’; काँग्रेस नेत्याचा सरकारला टोला
तर विरोधकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना उत्तरं देता आलेली नाहीत. तर याच अधिवेशनात सरकारकडून विरोधकांना शून्य टक्के निधी देण्याचा निर्णय झाल्यावरून काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना आरोप केला आहे.
कोल्हापूर, 23 जुलै 2023 | राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. याच दरम्यान विरोधकांनी अनेक प्रश्नावरून सरकारला घेरलं आहे. तर विरोधकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना उत्तरं देता आलेली नाहीत. तर याच अधिवेशनात सरकारकडून विरोधकांना शून्य टक्के निधी देण्याचा निर्णय झाल्यावरून काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना आरोप केला आहे. यावेळी पाटील यांनी, विरोधी पक्षाच्या आमदारांना शून्य टक्के निधी देणे हा बजेट मध्ये झालेला अत्यंत दुर्दैवी निर्णय असल्याचे म्हटलं आहे. तर राज्याच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही, सत्ताधाऱ्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. मात्र विरोधकांना झुकतं माप देत शून्य टक्के निधी देण्यात आला. तर काही प्रश्नांची उत्तर द्यायचे नाहीत असेच शासनाने ठरवल्याचा असा आरोप देखील पाटील यांनी केला आहे. तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच असून सर्वजण या प्रश्नांना वाचा फोडत राहू असे देखील पाटील यांनी म्हटलं आहे.