55 वर्षांचं नातं तुटलं, मिलिंद देवरा यांचं एक ट्विट आणि राजकीय वर्तुळात गोंधळ
मिलिंद देवरा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
Milind Deora Resigns: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मिलिंद देवरा यांच्या या निर्णयाने सध्या सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. आज सकाळी (14 जानेवारी ) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिलिंद देवरा हे आजच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठी धुसफूस सुरु असल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाकडून अनेक वेळा दक्षिण मुंबई मतदारसंघात दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते मिलिंद देवरा नाराज असल्याचं दिसून आलं आणि त्यांनी याच नाराजीतून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असं म्हटलं जात आहे. मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील होत आहे.