नाना पटोले म्हणाले, ती परंपरा तर आमचीच, भाजपने मोडली आणि आता पुन्हा आवाहन?

| Updated on: Jan 26, 2023 | 1:53 PM

उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या पक्षांना विनंती करू. ती मान्य करायची की नाही हे त्यांनी ठरवावे असे सांगितले आहे.

मुंबई : पुणे जिल्ह्यातील कसबा ( kasba ) आणि पिंपरी चिंचवड ( pimpari chinchwad ) विधानसभेसाठी २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तर, पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातच उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.

उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या पक्षांना विनंती करू. ती मान्य करायची की नाही हे त्यांनी ठरवावे असे सांगितले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात बोलताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर आम्ही निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा सुरु केली होती. पण ती परंपरा भाजपने मोडली अशी टीका करतानाच या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे असे स्पष्ट केले.

Published on: Jan 26, 2023 01:53 PM
प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे शनिवारवाड्यात गर्दी, पाहा व्हीडिओ…
संतोष बांगर यांच्यावर कारवाई होणार? हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी स्पष्टचं सांगितले…