नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला ‘एटीएम’ बनवले, नाना पटोले यांची टीका

| Updated on: Nov 09, 2024 | 4:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याकडे बोट करतात पण चार बोटे त्यांच्या स्वत:कडे आहेत हे विसरतात. मोदींनी उलट महाराष्ट्राला एटीएम बनविले आहे अशी टीका कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

महाविकास आघाडीला महाराष्ट्राचा ‘एटीएम’ बनविण्यापासून रोखा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत जनतेला उद्देश्यून केले होते, त्यावर जालना येथून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी जोरदार टीका केलेली आहे. उलट नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून गुजरातला दिले आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. भाजपा ओबीसीला एखाद्या कुत्र्याप्रमाणे समजते. पंतप्रधान स्वत:ला ओबीसी म्हणतात. परंतू यांच्या एका नेत्याने वणी येथील सभेत ओबीसींच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्याबद्दल यांच्या कोणत्याही नेत्याने साधी माफी देखील मागितलेली नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. भाजपाला ओबीसींचे काही पडलेले नाही यांना केवळ मनुस्मृती आणायची आहे अशी टीका नाना पटोले यांनी केलेली आहे.

Published on: Nov 09, 2024 04:44 PM
जेवढे मोदी – शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा, जयंत पाटील यांचा दावा
भाजपा – शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, संजय राऊत यांची सनसनाटी टीका