Video : कॉंग्रेसवर बोलायची अशोक चव्हाण यांची लायकी नाही, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची टीका

| Updated on: Apr 01, 2024 | 5:17 PM

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी युपीए सरकारच्या काळाती भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढताच कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसवर टीका केल्यानंतर त्यास कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे.

 नागपूर : कॉंग्रेसमधून भाजपावासी झालेले नांदेडचे नेते अशोक चव्हाण यांनी काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या रॅलीनंतर आपल्या पूर्व पक्ष कॉंग्रेसवर तोंडसुख घेतले होते. राज्यातील विद्यमान नेतृत्वामुळे कॉंग्रेसची फरफट सुरु आहे. कॉंग्रेसचे राज्यात जे एकेकाळी महत्व होतं ते राहीले नाही अशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता अशोक चव्हाण यांनी टीका केली होती. यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या जीवावर पदे मिळवून मालमत्ता कमावली, भ्रष्टाचार करून सत्ता भोगली आणि आता भाजपात गेले आहेत. अशोक चव्हाण यांची सध्याची स्थिती काय आहे ? एखादा माणूस स्वत:चे कपडे फाडतो तशी त्यांची स्थिती आहे. कॉंग्रेसवर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चं पहावं, कॉंग्रेसवर बोलण्याची त्यांची लायकी नाही अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली आहे. कॉंग्रेस सर्वात जुना पक्ष आहे. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, देशासाठी बलिदान करणारा हा पक्ष आहे असे पटोले यांनी यावेळी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांचा भाजपाशी कनेक्शन असल्याची टीका केली आहे त्यावर नाना पटोले यांनी चार दिवसांत आपण प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देणार आहे. 2014 आणि 2019 लोक कोणी फिक्सिंग केलं? भाजपाची बी टीम कोण ? त्यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरदार सुरु आहे. पूर्व विदर्भातील पाचही जागा कॉंग्रेस जिंकणार असे स्पष्ट चित्र असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 01, 2024 05:13 PM
‘वहिनी आईसमान वाटते, तर मग तुम्ही…’, भाजपा नेत्याचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला
महागाईचा मार त्यात वाढणार खिशावरील भार; आजपासून ‘या’ गोष्टी बदलणार