सुनील तटकरे यांच्या आव्हानाला काँग्रेस नेत्याचा टोला; म्हणाला, ‘बाप शेवटी बाप असतो’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार हे अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. आता काहीच आमदार आणि खासदार हे शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. मात्र याच दरम्यान अजित पवार गटाकडून आता थेट शरद पवार यांनाच आव्हान दिलं जात आहे.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राज्याच्या राजकारणात कधी राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल असे कोणालाही वाटलं नव्हते. पण वर्षभरापुर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. राष्ट्रवादी फुटल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट तयार झाले आहेत. शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता थेट पवार यांना दैवत म्हणणारे आव्हान देत आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील असेच शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी शरद पवार हे जर महाविकास आघाडी सोबत जाऊन शकतात तर मग आम्ही भाजपसोबत का नाही जाऊ शकत असा सवाल केला आहे. त्यावरून आता काँग्रेस नेते नसीम खान यांनी तटकरे यांना खडे बोल सुनावले आहेत. तटकरे यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी शरद पवारांवर टीका करण्याआधी त्यांनी स्वतःकडे पहावं. बाप शेवटी बाप असतो आणि बापाच्या नादाला यांनी लागू नये. त्यांच्याबाबत बोलण्या इतपतं तटकरे हे मोठे झालेले नाहीत.