दावे-प्रतिदावे, अजित पवार मुख्यमंत्री होणार? पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फडणवीस यांनी खोडला; पाहा स्पेशल रिपोर्ट…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक कुटुंबासह दिल्ली दौरा केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय.त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का या चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांची इच्छा असल्याचं विधान अनिल पाटील यांनी केलंय.यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 10 ऑगस्टच्या आत मुख्यमंत्री होतील,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबियांसह पंतप्रधानांना भेटले. ही त्यांची फेअरवेल पार्टी तर नव्हती ना? कारण नवीन पद मिळाल्यावर अशी भेट होते. आता भेटण्यामागे काहीच कारण नव्हते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. त्याच्या हा दावा देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही हे माहिती नाही पण राज्यातलं राजकारण पुढील दिवसात चांगलंच तापणार आहे. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…