प्रियंका गांधी थेट राजकारणात उतरणार? अमेठी किंवा रायबरेलीतू मैदानात उतरण्याची शक्यता

| Updated on: Aug 02, 2023 | 2:56 PM

अनेक राज्यामधील काँग्रेसच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. तर कर्नाटकात काँग्रेसने कमबॅक करत आपले अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे. त्यापाठोपाठ आता देशात लोकसभेच्या निकडणूका होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट 2023 | सध्या देशातील सगळ्यात जुणा पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली पाहायला मिळत आहे. अनेक राज्यामधील काँग्रेसच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. तर कर्नाटकात काँग्रेसने कमबॅक करत आपले अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे. त्यापाठोपाठ आता देशात लोकसभेच्या निकडणूका होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमिवर विरोधक एकत्र आले आहेत. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान आता विरोधकांसह काँग्रेसकडून उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या समोर कडवे आव्हान निर्माण करण्याची खेळी आखली जात आहे. येत्या निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी प्रियांका गांधी सोडली आहे. तर त्या आता थेट मैदानात उतरणार आहेत. त्या अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी प्रयागराज, फुलपूर मतदारसंघाचीही चाचपणी केली जात असल्याचेही बोलले जात आहे.

Published on: Aug 02, 2023 11:40 AM
“संभाजी भिडे राष्ट्रद्रोही माणूस, जिथे दिसतील तिथून उचलून कोठडीत घाला”, काँग्रेस नेत्याची राज्य सरकारकडे मागणी
“उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील”, माजी आमदाराचा मोठा दावा