Rahul Gandhi At ED Office | काँग्रेसचे नेते राहुल गांधी ईडी कार्यलायकडे रवाना

| Updated on: Jun 13, 2022 | 12:19 PM

ईडीच्या मुख्यालयात राहुल गांधींच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. रहुल गांधी पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस नॅशनल हेराल्डप्रकरणी पाठवण्यात आली आहे. ईडीच्या मुख्यालयात राहुल गांधींच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. नोटीस आल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींच्या हजेरीपूर्वी प्रियांका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. येथून राहुल-प्रियांका काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला. नेत्यांना पुढे जाऊ दिले नाही.

Published on: Jun 13, 2022 12:19 PM
Rahul Gandhi : राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल, राहुल हे गांधींचे वंशज आहेत, त्यांना ईडी रोखू शकत नाही, काँग्रेसचं ट्विट
Atul Khupse On Ujani Water Crisis | उजनीच्या पाण्यावरून पाणी बचाव समिती आक्रमक