‘तीन चाकी सरकारमधील पहिलं चाक पंक्चर होतयं याकडे लक्ष?’ शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर कोणी केली घणाघाती टीका
यादरम्यान तीन इंजनचं सरकार असं म्हणत अजित पवार याचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. हाच मुद्दा धरत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधला आहे.
नागपूर : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्ररवेश केला. त्यावेळी त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तर त्या टीकेली सत्ताधारी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी पलटवार केला होता. यादरम्यान तीन इंजनचं सरकार असं म्हणत अजित पवार याचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. हाच मुद्दा धरत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी याच्याआधीही राज्यात तीन पक्षांचंच सरकार होतं. त्यावेळी तीन पक्षांची रिक्षा असा टोला विरोधकांनी लगावला होता. पण ते सरकार अडीच वर्ष चाललं. मात्र आताचे सरकार कोणतं आहे. हे सरकार तीन इंजनचं आहे की तीन चाकाचं? असा सवाल त्यांनी केला आहे. तर या तीन चाकाचं सरकार कधी पंक्चर होतं हेच आता लोक बघतं आहेत. तर या रिक्षाचं पुढचं चाकचं पंक्चर झालं असून ही रिक्षा तशीच रेटण्याचं काम सध्या सुरू अशल्याचं त्यांनी म्हटलं आहे.