अजित पवार यांनाच अर्थखातं मिळणार, हिंमत असेल तर…; काँग्रेस नेत्याचं थेट शिंदे गटातील आमदारांना आव्हान

| Updated on: Jul 13, 2023 | 12:18 PM

याच्या आधी शिवसेना फूटल्यानंतर शिंदे गटातील आमदार हे अजित पवार हे अर्थमंत्री असताना शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते अशी ओरड त्यांनी केली होती. पण आता तेच अजित पवार आता सत्तेत आहेत. तर त्यांच्याकडे आता अर्थ खातं जात आहे.

नागपूर : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्ररवेश केल्याने आता शिंदे गटासह भाजपच्या आमदारंची गोची झाली आहे. याच्या आधी शिवसेना फूटल्यानंतर शिंदे गटातील आमदार हे अजित पवार हे अर्थमंत्री असताना शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नव्हते अशी ओरड त्यांनी केली होती. पण आता तेच अजित पवार आता सत्तेत आहेत. तर त्यांच्याकडे आता अर्थ खातं जात आहे. यावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं भाष्य करताना शिंदे गटातील नेत्यांना त्याचा त्रास हा होणारच असं म्हटलं आहे. तर आता जाहिरपणे बोला आम्ही सरकारमध्ये राहू शकत नाही. जर तुमच्या शब्दाला मान असेल, स्वाभिमान असेल, शब्दाला किंमत असेल तर बोला असे आव्हान त्यांनी शिंदे गटातील आमदारांना केलं आहे.

Published on: Jul 13, 2023 12:18 PM
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी सांगितला दिवस
“महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीत फेऱ्या का?” संजय राऊत यांची राज्य सरकारवर टीका