भिवंडी लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; काँग्रेस नेत्याचा दावा; म्हणाला, ‘काँग्रेसकडेच’
राज्यात सध्या राजकीय समिकरणांना उत आला आहे. येथे सत्ता आणि पक्षांना मजबूत करण्यासाठी रस्सी खेच होत आहे. अशीच रस्सी खेच सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
ठाणे : 17 ऑगस्ट 2023 | राज्यात महविकास आघाडी सरकार सत्तेवर आले असताना कोरोना काळात चांगल काम केले जात होते. मात्र दुर्दैवी राजकीय घटना घडल्या आणि नवे सरकार सत्तेवर आले. एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत फूट पाडली आणि येथेही दोन गट तयार झालेत. ज्यात एक मविआबरोबर आणि एक सत्तेत आहे. पण मी केवळ भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम करणार आहे. भिवंडी लोकसभा काँग्रेसकडेच रहावी असा येथील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तो रास्तही असून येथील वातावरण काँग्रेससाठी पोषक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहचवणार असल्याचे काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगितले. यावेळी मध्यंतरी भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी पक्षाने दावा केला होता. मात्र आता त्यांच्यातच अंतर्गत विषय सध्या वेगळे आहेत. तर राष्ट्रवादी काँगेसच्या कोणत्या गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता हे माहित नाही असे देखील कदम यांनी म्हटलं आहे. तर भिवंडी लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो काँग्रेसकडेच ठेवणार अशी ठाम भूमिका विश्वजीत कदम यांनी घेतल्याचे म्हटलं आहे.