कुशलच्या निधीवरून यशोमती ठाकूर आक्रमक; थेट अजित पवार यांच्यावरच टीका, म्हणाल्या, ‘सत्ताधारी बाकावर बसून’

| Updated on: Jul 19, 2023 | 1:00 PM

शेती आणि खतांच्या किमतीवरुन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि विजय वडेट्टीवर आधी आमने-सामने आले. त्यानंतर कृषी निधी आणि कुशलच्या पैशांवर सभागृहात गोंधळ उडाला.

मुंबई, 19 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस सुरू आहे. तर सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून शेती आणि खतांच्या किमतीवरुन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि विजय वडेट्टीवर आधी आमने-सामने आले. त्यानंतर कृषी निधी आणि कुशलच्या पैशांवर सभागृहात गोंधळ उडाला. कृषी निधीसंदर्भात भेदभाव केला जातोय. तर विरोधकांना कुशलचा निधी दिला जात नाही असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधताना ते आधी विरोधकांच्या असताना प्रश्न रेटून मांडायचे पण आता सत्ताधारी बाकावर बसून भाषा बदलत आहेत अशी टीका केली. त्यानंतर त्यांनी विरोधकांना निधी का मिळत नाही, अशीही विचारणा केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू. यावरून रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदिपान भूमरे म्हणाले, कुशलाचा नीधी सर्वांना मिळतो. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे.

Published on: Jul 19, 2023 01:00 PM