Pune Agneepath Protest | अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचा मोर्चा-tv9
वक काँग्रेसकडून भाजपच्या विरोधात तसेच केद्र सरकारच्याविरोधात घोषणा दिल्या. यावेळी भाजपच्या कार्यालयातील उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी देखील घोषणाबाजी केली.
पुणे : केंद्र सरकारने (Central Government) आणलेल्या अग्निपथ योजनेला तरूणांनी जबरदस्त विरोध दाखवला आहे. या योजनेविरोधात देशातील 13 राज्यातील तरूणांनी रणशिंग फुकंत ही योजना (Agneepath Yojana) मागे घ्या अशी मागणी केली आहे. दरम्यान आज पुण्यात ही युवक काँग्रेसकडून भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच युवक काँग्रेसकडून (Youth Congress) भाजपच्या विरोधात तसेच केद्र सरकारच्याविरोधात घोषणा दिल्या. यावेळी भाजपच्या कार्यालयातील उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी देखील घोषणाबाजी केली. यावेळी युवक काँग्रेसकडून राहुल राहूल तर भाजपकडून मोदी मोदी म्हणत घोषणाबाजी केली. तसेच यावेळी ईडी कडून करण्यात आलेल्या चौकशीचाही निषेध करण्यात आला. यामुळे तेथील वातावरण थोडे तंग झाले होते. दरम्यान पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले.