नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी अधीर रंजन चौधरींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
काँग्रेसविरोधीही घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी घराणेशाहीविरोधातही भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन चौधरींच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल लोकसभेत आज वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून आज अधीर रंजन चौधरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसविरोधीही घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी घराणेशाहीविरोधातही भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन चौधरींच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.