शिक्षेवरुन काँग्रेस आक्रमक, भाजपची आंदोलनाची हाक; राहुल गांधी शिक्षा प्रकरण तापणार
राहुल गांधी यांच्या संदर्भात निकाल आल्यानंतर मुंबईत विधानभवन परिसरात काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, भाई जगताप, पृथ्वीराज चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यांना ही शिक्षा सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या वक्तव्यावरून सुरत न्यायालयाने सुनावली आहे. त्या निर्णयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. याचदरम्यान आज काँग्रेसचे खासदारांचा संसदभवन चे विजय चौकपर्यंत मोर्चा निघणार आहे. तर भाजपने देखील राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची हाक दिली आहे.
काल राहुल गांधी यांच्या संदर्भात निकाल आल्यानंतर मुंबईत विधानभवन परिसरात काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, भाई जगताप, पृथ्वीराज चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला. तर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.