पाकिस्तान आणि राहुल गांधी हे एकच आहेत; त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा
राहुल गांधी यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर देशाच त्यांच्यावर टीका होत आहे
मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा यूके दौरा झाला. यादरम्यान, ते केंब्रिज विद्यापीठातील त्यांनी अल्मा माटरमध्ये व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर देशाच त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या या विधानावर भाजप नेते आमदार नितेश राणे टीका करताना, राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. आपल्या देशाची बदनामी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन करतात. तेथे टाळ्या मिळवतात. राहुल गांधी आणि पाकिस्तान आपल्या देसाचा सारखाच द्वेष करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणी केली आहे.
Published on: Mar 11, 2023 03:50 PM