विकृत विचारांची मस्ती जात नाही, अशा शब्दात भाजप नेत्याची मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीका

| Updated on: Apr 28, 2023 | 7:54 AM

यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, म्हणूनच ते विश्वप्रिय नेते पंतप्रधान यांच्याबद्दल वारंवार वाईट बोलतात. कर्नाटक निवडणुकीत खरगेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या.

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना विषारी साप म्हणत टीका केली. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून भाजपने पलटवार केला आहे. तर यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी टीका करणे सुरू केलं आहे. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी टीका केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, म्हणूनच ते विश्वप्रिय नेते पंतप्रधान यांच्याबद्दल वारंवार वाईट बोलतात. कर्नाटक निवडणुकीत खरगेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या. गांधी परिवाराला मोदीजींबद्दल आकस आहेच. ‘मौत का सौदागर’ पासून सुरु झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज ‘जहरीला साप’ इथंपर्यंत पोचला. यांना कधीच चांगले शब्द सापडत नाहीत. बोलताही येत नाहीत. त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. त्यांची सत्ता गेली, राज्ये गेली, मतदार गेले, समर्थक गेले, नेते गेले, खासदारकी गेली, घर गेले पण डोक्यातली विकृत विचारांची मस्ती जात नाही. तुम्हाला कर्नाटकी जनता माफ करणार नाही.

Published on: Apr 28, 2023 07:54 AM