राज्याच्या सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला ‘या’ जिल्हापरिषदेत भाजप लावणार सुरूंग?
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. तर याच महिन्याच्या २ जुलैला अजित पवार यांनी आपल्या गटासह सत्तेत प्रवेश करत अनेकांना धक्का दिला. तर अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झालेत.
नागपूर | 22 जुलै 2023 : महाविकास आघाडीची सत्तापालट करण्यासाठी महाराष्ट्रात ‘ॲापरेशन लोटस’ राबवण्यात आलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. तर याच महिन्याच्या २ जुलैला अजित पवार यांनी आपल्या गटासह सत्तेत प्रवेश करत अनेकांना धक्का दिला. तर अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झालेत. राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर राष्ट्रवादीत भूकंप होने सुरूच आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आणि जिल्हा परिषदेतं ‘ॲापरेशन लोटस’ होण्याची जोरदार शक्यता आहे. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून तेथे आता ‘ॲापरेशन लोटस’ राबवलं जाणार आहे. याबाबत नागपूर जिल्हा परिषदेतील भाजपचे विरोधीपक्ष नेते सतिश उमरे यांनी दावा केला आहे. त्यांनी हा दावा करताना, “जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नाराज सदस्यांचा गट भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटलं आहे. त्यासोबत राष्ट्रवादीतंही दोन गट पडलेय. लवकरंच नागपूर जिल्हा परिषदेत सत्तापालट होईल” असा दावाही उमरे यांनी केलाय.