Gadchiroli Elephants | ‘हत्ती पळवणाऱ्या सरकारचा निषेध असो’ , काँग्रेसचा हत्ती स्थलांतराविरोधात आंदोलन
Gadchiroli Elephants | काँग्रेस पक्षाने गडचिरोली जिल्ह्यातून हत्तींच्या स्थलांतराला विरोध केला आहे. त्याविरोधात त्यांनी आज आंदोलन केले.
Gadchiroli Elephants | काँग्रेस पक्षाने गडचिरोली जिल्ह्यातून हत्तींच्या स्थलांतराला (Gadchiroli Elephants) विरोध केला आहे. त्याविरोधात त्यांनी आज आंदोलन केले. जवाब दो आंदोलन, असे या आंदोलनाचे नाव होते. स्थानिक नागरीक, वन्यप्रेमी, पर्यावरणप्रेमींसह काँग्रेस पक्षाने (Congress) या आंदोलनात सहभाग घेतला. जिल्ह्यातून हत्तींचे स्थलांतर (Migration) होऊ देणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत हे स्थलांतर स्थगित करत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर वनप्रशासनाने हत्तींचे स्थलांतर करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. नक्षलग्रस्त जिल्ह्याची ओळख हत्तींमुळे नष्ट होत असल्याने हत्तींचे स्थलांतर करु नये अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर वनप्रशासनाने हत्तींचे स्थलांतर करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला