खरगेंच्या वक्तव्यावर राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता भडकला; म्हणाला, ही आपली….
खरगेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, आज नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान आहेत. यापूर्वी मनमोहन सिंग होते, अटलबिहारी वाजपेयी होते. देशाच्या पंतप्रधान किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य करणे योग्य वाटत नाही
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. खरगे यांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. तर कर्नाटकात भाजप आमदाराने काँग्रेसला जशास तसे उत्तर देत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा उल्लेख विषकन्या असा केला. त्यानंतर यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) आमचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर अशी टिप्पणी करणे चुकीचे आहे. कर्नाटकमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची तुलना विषारी सापाशी केली. वाद वाढत असताना त्यांनी स्पष्टीकरण दिले की, आपली टिप्पणी पंतप्रधानांसाठी नसून सत्ताधारी भाजपसाठी होती. खरगेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, आज नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान आहेत. यापूर्वी मनमोहन सिंग होते, अटलबिहारी वाजपेयी होते. देशाच्या पंतप्रधान किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य करणे योग्य वाटत नाही