राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचं ‘जय भारत’ सत्याग्रह

| Updated on: Mar 29, 2023 | 9:12 AM

राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि लोकसभेतून अपात्र ठरवण्याच्या मुद्यावरून आजपासून देशभरात काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह सुरू होणार आहे

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यावरुन काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने लाल किल्ल्यापासून टाऊन हॉलपर्यंत मशाल मार्च काढण्याची घोषणा केली. याशिवाय 29 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत स्थानिक पातळीवर ‘जय भारत सत्याग्रह’ केला जाणार आहे.

राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि लोकसभेतून अपात्र ठरवण्याच्या मुद्यावरून आजपासून देशभरात काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह सुरू होणार आहे. 8 एप्रिल पर्यंत देशभरात काँग्रेस वेगवेगळे राबवणार आहे. तर लोकसभेतून अपात्रेवरून काँग्रेस पुढील आठवड्यात न्यायालयात देखील जाणार आहे.

तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे. त्यावरूनही आता वातावरण चांगलेच गरम होताना दिसत आहे. या नोटीसवरून राहुल गांधी यांनी त्तर दिले आहे. या नोटीसवर उत्तर देताना राहुल यांनी हे करून दाखवा असं म्हटलं आहे. तर या घराशी आपल्या अनेक आठवणी जोडल्या गेल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Published on: Mar 29, 2023 09:12 AM
4 Minutes 24 Headlines | शिंदे फक्त मुखवटा, राज्य फडणवीस चालवतात
नको असणारं मंत्रिपद दिलंय, पालकमंत्रिपदही हव्या ‘त्या’ जिल्ह्याचं दिलं नाही; शिवसेनेच्या मंत्र्याची नाराजी उघड