राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे भेटीवर यशोमती ठाकूर म्हणाल्या, तर…
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या भेटीवर त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची जर भेट होत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे. दोन्ही नेते अतिशय सालस आहेत
अमरावती : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लवकरच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीत होत असलेले डॅमेज आणि नेत्यांमधील मतांतरावर ही भेट महत्वाची मानली जात आहे. त्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या भेटीवर त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची जर भेट होत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे. दोन्ही नेते अतिशय सालस आहेत. दोन्ही नेत्याचा एकच उद्देश संविधान वाचावा हा आहे. ते वाचवण्यासाठी जे करावे लागलं ते करायला हे नेते तयार आहेत. तर आपण या भेटीला पॉझिटिव्ह घेतो असे ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर दोन्ही नेते हे जे काही निर्णय घेतील ते या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी फायदेशीर असेल असही त्या म्हणाल्या.
Published on: Apr 14, 2023 01:54 PM