माफी मागणं त्यांच्या रक्तातच नाही ; रवींद्र धंगेकर यांची भाजपवर सडकून टीका

| Updated on: Mar 25, 2023 | 12:21 PM

धंगेकर यांनी, देशातील भाजपचे सर्व नेते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई करण्यात आली आहे ती सूडातून झाल्याचे ते म्हणाले.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यामुळे सध्या देशभरात सत्ताधारी भाजप आदोलन करत आहे. तर याच वक्तव्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. आज याप्रकरणी काँग्रेस आंदोलन करणार आहे. यावरूनच कसबापेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

धंगेकर यांनी, देशातील भाजपचे सर्व नेते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई करण्यात आली आहे ती सूडातून झाल्याचे ते म्हणाले. तर राहुल गांधी हे कधीही माफी मागणार नाहीत. माफी मागणं त्यांच्या रक्तातच नाही. माफी मागायला त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही.

Published on: Mar 25, 2023 12:21 PM
पुण्यातील बँनरबाजीवर बच्चू कडू भडकलेच; म्हणाले, सगळी मुर्खताच
जोपर्यंत ‘हा’ नेता आमदार आणि मंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी मालेगावात राहील; संजय राऊत यांचं वक्तव्य