शिक्षेविरोधात सुरत सत्र न्यायालयात राहुल गांधी करणार अपील
राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी ‘मोदी हे सर्व चोरांचे आडनाव का आहे?’ या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल केली होती.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातमधील सुरत येथील सत्र न्यायालयात जाणार आहेत. ‘मोदी आडनाव’ संदर्भात मानहानीच्या खटल्यात त्यांना झालेल्या शिक्षेविरुद्ध ते अपील दाखल करणार आहेत. 2019 च्या गुन्हेगारी मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते स्वतः कोर्टात हजर राहणार आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी ‘मोदी हे सर्व चोरांचे आडनाव का आहे?’ या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल केली होती.
सुरतमधील न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुलला ‘मोदी आडनावा’बद्दल केलेल्या टिप्पणीच्या संदर्भात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 15,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. ज्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आणि आता त्यांना सरकारी बंगला देखील रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
Published on: Apr 03, 2023 10:32 AM