जनतेचा माफी मागा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील; राहुल गांधींना भाजपच्या नेत्याचा इशारा

| Updated on: Apr 14, 2023 | 1:10 PM

राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत असून राज्यातील नेत्यांची एकत्र बैठका होत आहेत. आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला आहे. त्यांनी माफी मागवी यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. त्यावरून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रा काढून राहुल गांधी यांचा निशेध केला जात आहे. यादरम्यान राज्यात महाविकास आघाडीत (MVA) बिघाडी होताना दिसत असून राज्यातील नेत्यांची एकत्र बैठका होत आहेत. आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीला (Matoshree) भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून पुन्हा एकदा भाजप आक्रमक झाली आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल चढवला आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्रांत पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी’, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय.

 

Published on: Apr 14, 2023 01:09 PM
‘आपल्या वक्तव्यामुळे पप्पू होवू नये, काळजी घ्यावी’, ‘या’ मंत्र्यानं दिला आदित्य ठाकरे यांना सल्ला
मविआ लोकसभेला किती जागा जिंकणार?, संजय राऊत यांनी स्पष्ट आकडाच सांगितला