सावरकरांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा
मुख्यमंत्री शिंदे हे सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काल मुंबईत आयोजित सावरकर गौरव यात्रेत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली
मुंबई : काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला जात आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात शिंदे गट, भाजपने राण उठवले आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात मोर्चे काढले जात आहेत. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप तर्फे सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. याच यात्रेत मुख्यमंत्री शिंदे हे सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काल मुंबईत आयोजित सावरकर गौरव यात्रेत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच सावरकरांचा अपमान जे करतील त्यांना आपण माफ करणार का असा सवाल त्यांनी जनतेला केला. तर आता सावकर प्रेमी रस्त्यावर उतरला आहे. सावरकरांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचे ते म्हणालेत.
Published on: Apr 06, 2023 07:16 AM