सावरकर विषयावर दोनच वाक्यात संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, पुढे पाहू

| Updated on: Mar 29, 2023 | 12:03 PM

राऊत यांनी, सावरकर हा विषय जो आहे तो आमच्यासाठी संपलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आहे

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यात पुन्हा राहुल गांधींच्या ‘मी वीर सावरकर नाही’ या वक्तव्याने आगीत तुप ओतण्याचे काम केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्याच्या गटातील खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. त्यानंतर राऊत यांनी, मी दिल्लीला जात आहे. सावरकरांच्या संदर्भात मी स्वतः राहुल गांधींशी बोलेन. ते म्हणाले की ते नक्कीच राहुल गांधी आहेत, पण त्यात सावरकरांना ओढण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतर आता ते दिल्लीत आहेत. त्यांची राहुल गांधींशी चर्चा झाली का? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर राऊत यांनी दोनच शब्दात याविषयावर भूमिका मांडली आणि हा विषय येथे संपला आहे. पुढे बघू असे म्हटलं आहे. राऊत यांनी, सावरकर हा विषय जो आहे तो आमच्यासाठी संपलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आहे. हा आमच्यासाठी संपलेला आहे. आता भविष्यात काय होतंय ते पाहू अशी प्रतिक्रिया देली आहे.

 

Published on: Mar 29, 2023 12:03 PM
घोड्यावरून संजय राऊत यांचा कोणाला टोला? म्हणाले, ताकद विसरला
गिरीश महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झालीये; एकनाथ खडसे भडकले