तुमचे लोक महापुरूषांचे अपमान करता तेंव्हा तत्व गुंडाळून ठेवायची आणि….; भाजपवर पटोलेंची सडकून टीका

| Updated on: Apr 15, 2023 | 11:50 AM

देशाचे पंतप्रधान लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करतात. ते त्यांना आंदोलन जिवी, खलिस्तानी म्हणतात. अन्नदात्याचा अपमान करतात. तर त्यांचेच मंत्री, नेते आणि तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात तेव्हा कुठे होती तुमची तत्व असा सवाल केला आहे

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येणार आहेत. त्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. तर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याची आधी माफी मागा नाहीतर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका केली आहे.

त्यांनी देशाचे पंतप्रधान लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करतात. ते त्यांना आंदोलन जिवी, खलिस्तानी म्हणतात. अन्नदात्याचा अपमान करतात. तर त्यांचेच मंत्री, नेते आणि तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात तेव्हा कुठे होती तुमची तत्व असा सवाल केला आहे. तर आपल्या लोकांनी केलं तर त्यावर बोलायचं नाही आणि मी सावरकर नाही मी राहुल गांधी आहे हे म्हटल्यावर राजकारण करायचं, आंदोलने करायची. भाजपचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहेत. तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावायचं काम अगर बीजेपी करत असेल तर महाराष्ट्राची जनता या धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार असेही नाना पटोले म्हणाले.

Published on: Apr 15, 2023 11:50 AM
महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावू नका; काँग्रेस नेत्याचा भाजपवर पलटवार
खोपोली अपघातावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…